मातृभूमि धारानगरी : पँवारी स्वाभिमान की कथा
एक मराठी लेख
प्रखर देशाभिमानाची उदाहरणे
आपापल्या राष्ट्रा तील माणसाचा राजपूत राजाना केवढा अभिमान असे व राष्ट्रीय इभ्र तीची ते किती पर्वा करीत , तसेच आपल्या मातृभूमीच्या नावाचा राजपूत लोकाना किती अभिमान वाटे व तिच्या सरक्षणाकरिता केवढा आत्मयज्ञ करण्यास ते तयार असत याविषयीची एक सुदर व उद्बोधक आख्यायिका जेसलमीरच्या इतिहासातून टॉडने दिली आहे.
देवरावळ येथे देवराज नावाचा राजपूत राजा राज्य करीत होता . ह्या देवरावळचा यशकरण नावाचा एक व्यापारी धारानगरीस गेला असताना तेथील प्रमार राजाने त्यास पकडले व बरीच मोठी खडणी घेऊन सोडून दिले यशकरणने परत येऊन देवराजला आपल्या अपमा नाचे सर्व वर्तमान निवेदन केले देवरावळच्या एका व्यापायाचा अपमान म्हणजे आपल्या राष्ट्राचा अपमान होय असे म्हणून देवराजने ‘ जोपर्यंत मी अपमानाचा सूड घेणार नाही तोपर्यंत तोडात पाण्याचा थेब देखील घालणार नाही ' अशी प्रतिज्ञा केली देवरावळहून धार किती लांब आहे याचे त्यास त्या वेळी भान राहिले नाही आपल्या प्रतिज्ञेचे शब्दश पालन होणे अशक्य आहे हे दिसून आल्यामुळे त्याने आपल्या शहराबाहेर गायची - मातीची - एक खोटीच धारानगरी बनविली व तिच्यावरच आपण हल्ला करून तिला जमीनदोस्त करू व पाणी पिऊ आणि नंतर खरोखरच्या धारवर हल्ला करू असे त्याने ठरविले.
देवराजच्या सैन्यात काही प्रमार वंशाचेही लोक होते त्याना ह्या बनावट का होईना पण धारानगरीवर हल्ला करण्यात येणार ही गोष्ट सहन झाली नाही त्याचा आपल्या मातृभूमीचा - धारचा - अभिमान इतका जाज्वल्य होता की , त्यानी देवराजला कळविले की , ' आम्ही तुझे मैनिक असलो व तू आमचा धनी असलास तरी आम्ही आमच्या मातृभूमीच्या विरुद्ध तुझ्या बाजूने लढणार नाही एवढेच नव्हे तर ह्या मातीच्या धारवर देखील तू हल्ला करशील तर आम्ही तिचे सरक्षण करू '
परन्तु त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून देवराजने ह्या बनावटी धारेवर हल्ला करण्यास शिपायाना हुकूम दिला त्या १२० तेजस्वी प्रमारांनी
जहा पँवार त्या धार है और धार त्या पँवार ।
धार बिना पँवार नही और पँवार बिना धार । -
" जेथे पवार आहेत तेथे धार सुरक्षित असलीच पाहिजे व जेथे धार आहे तेथे पवार असलेच पाहिजेत धारवाचून पवार जगू शकत नाही व पवारावाचून धार असू शकत नाही "
असे म्हणून तेजसिंह नामक आपल्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली तरवारी उपसल्या व देवराजच्या सैन्याशी सामना दिला आपल्या मातृभमीच्या त्या मृण्मय प्रतिमेच्या संरक्षणासाठी त्या बहादूर १२० प्रमारानी देवराजच्या तरवारीखाली लढता लढता आपले प्राण सुद्धा अर्पण केले पण आपल्या जिवतपणी तिची विटबना होऊ दिली नाही. हे त्यांचे कृन्य उदात्त व दिव्य अशा देशाभिमानाचे नाही असे कोण म्हणेल व देवराजचा तरी निश्चय राष्ट्रीय अपमानाचा सूड घेण्यासाठीच झाला नव्हता काय ?



टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें