मातृभूमि धारानगरी : पँवारी स्वाभिमान की कथा
एक मराठी लेख प्रखर देशाभिमानाची उदाहरणे आपापल्या राष्ट्रा तील माणसाचा राजपूत राजाना केवढा अभिमान असे व राष्ट्रीय इभ्र तीची ते किती पर्वा करीत , तसेच आपल्या मातृभूमीच्या नावाचा राजपूत लोकाना किती अभिमान वाटे व तिच्या सरक्षणाकरिता केवढा आत्मयज्ञ करण्यास ते तयार असत याविषयीची एक सुदर व उद्बोधक आख्यायिका जेसलमीरच्या इतिहासातून टॉडने दिली आहे. देवरावळ येथे देवराज नावाचा राजपूत राजा राज्य करीत होता . ह्या देवरावळचा यशकरण नावाचा एक व्यापारी धारानगरीस गेला असताना तेथील प्रमार राजाने त्यास पकडले व बरीच मोठी खडणी घेऊन सोडून दिले यशकरणने परत येऊन देवराजला आपल्या अपमा नाचे सर्व वर्तमान निवेदन केले देवरावळच्या एका व्यापायाचा अपमान म्हणजे आपल्या राष्ट्राचा अपमान होय असे म्हणून देवराजने ‘ जोपर्यंत मी अपमानाचा सूड घेणार नाही तोपर्यंत तोडात पाण्याचा थेब देखील घालणार नाही ' अशी प्रतिज्ञा केली देवरावळहून धार किती लांब आहे याचे त्यास त्या वेळी भान राहिले नाही आपल्या प्रतिज्ञेचे शब्दश पालन होणे अशक्य आहे हे दिसून आल्यामुळे त्याने आपल्या शहराबाहेर गायची - मातीची - एक खोटीच धारानगरी बनविली व तिच्यावरच आप...